Girish Mahajan : अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका, प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने चांगलेच वातावरण तापले आहे. वाद चिघळल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपण अनावधानाने नाव घ्यायचे विसरलो, असे स्पष्टीकरण दिले. आता यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अनावधानाने नाव घ्यायचे विसरलात, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाकण्यात यावे, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.