शिल्पकलेतील किमयागाराचा महासन्मान; राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नवी दिल्ली नजीक नोएडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.