• Download App
    Maharashtra Assembly Budget Session 2026 news | The Focus India

    Maharashtra Assembly Budget Session 2026 news

    Jitendra Awhad : 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या; अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्याची गत जेफ्री एपस्टीनसारखी होऊ नये यासाठी त्याला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा, असे ते म्हणालेत. राज्यातील 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचा दावाही आव्हाड यांनी यावेळी केला.

    Read more

    CM Fadnavis : ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

    नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

    Read more