Mahakumbh Mela : महाकुंभमेळ्यात पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा अडीचपट जास्त लोकांनी सहभाग घेतला
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याची सांगता प्रयागराजच्या भूमीवर झाली आहे. यंदा महाकुंभात इतके लोक आले की त्यांनी आपला जुना विक्रम मोडला. ४५ दिवसांच्या या कार्यक्रमाला ६६ कोटींहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली आहे. जगात इतर कोणत्याही घटनेत इतके किंवा निम्मे लोक एकत्र जमले नाहीत.