नाव महागठबंधन, यात्रा मात्र वेगवेगळ्या; तरीही बिहारमध्ये बळकट भाजपला हरविण्याचा दावा!!
नाव महागठबंधन, यात्रा मात्र वेगवेगळ्या; तरीही बिहारमध्ये बळकट भाजपला हरविण्याचा दावा!!, असला प्रकार राज्यात सुरू आहे. बिहारमध्ये राहुल गांधींनी सुरुवातीला मतदार अधिकार यात्रा काढली. त्या यात्रेमधून त्यांनी कन्हैया कुमारला बिहारचे नवीन नेतृत्व म्हणून पुढे आणायचा प्रयत्न केला परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही हे लक्षात येताच त्यांनी तेजस्वी यादवला बरोबर घेतले. 50 पैकी 20 मतदारसंघांमध्ये तेजस्वी यादव बरोबर यात्रा काढली. त्यानंतर राहुल गांधींनी ब्रेक घेतला आणि ते मलेशियाला निघून गेले तिथे त्यांनी जाकीर नाईकची भेट घेतली असे सांगितले गेले.