Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले- अजितदादा पवार महाजातिवादी; राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकतात
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला होता. तर एका नेत्याने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांची पुन्हा जीभ घसरल्याचे समोर आले आहे.