पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदावरी मातेची नित्य महाआरती पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याची परंपरा यंदाही पाळली गेली. काल नाशिकमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असतानाही ११ समर्पित गोदासेवकांनी पुराच्या पाण्यात उभे राहून महाआरती संपन्न केली.