Spain : स्पेनमध्ये दोन हाय-स्पीड ट्रेनची धडक; 21 जण ठार, 73 जखमी; दोन्ही ट्रेनमध्ये सुमारे 500 प्रवासी होते
स्पेनमधील कॉर्डोबा प्रांतात रविवारी रात्री एक ट्रेन रुळावरून घसरून दुसऱ्या ट्रेनला धडकली. या अपघातात मृतांची संख्या २१ झाली आहे. ७३ प्रवासी जखमी झाले आहेत. एपीनुसार, दोन्ही ट्रेनमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते. अहवालानुसार, मलागा येथून माद्रिदला जाणारी ट्रेन रुळावरून घसरून जवळच्या लाईनवर गेली आणि तेथे माद्रिद–हुएलवा मार्गावर धावणाऱ्या AVE ट्रेनला धडकली.