Madan Rathore : भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची बिनविरोध निवड!
राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मदन राठोड यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर, मदन राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, निवडणूक अधिकारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांचे अभिनंदन केले.