CBI, Digital : CBI देशभरातील डिजिटल अरेस्ट केसेसची चौकशी करणार; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सुप्रीम कोर्टाने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ला देशभरातून समोर आलेल्या डिजिटल अटकेच्या प्रकरणांची अखिल भारतीय चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना डिजिटल अटकेच्या प्रकरणांच्या चौकशीत CBI ला मदत करण्याचे निर्देशही दिले.