Anna Hazare : लोकपाल सदस्यांना 70 लाखांची BMW,अण्णा हजारे यांचा आक्षेप; म्हणाले- आम्ही खूप झगडलो, पण ही फार दुर्दैवी गोष्ट
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो आणि त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे, असे ते म्हणालेत.