Rahul Gandhi : राहुल गांधींना लखनऊ हायकोर्टाचा धक्का; समन्स-दंड रद्दची मागणी फेटाळली, सावरकरांवर केली होती टीका
राहुल गांधी यांची याचिका लखनऊ उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यांनी वीर सावरकर मानहानी खटल्यात लखनौ सत्र न्यायालयाच्या समन्स आदेशाला आणि २०० रुपयांच्या दंडाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्यांना पर्यायी उपाय करण्याचा सल्ला दिला आहे आणि लखनौ सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.