Sushma Andhare : दृश्यमानता कमी तर CCTV फुटेज इतके स्पष्ट कसे? राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी मौन का बाळगले? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर त्यांचे विमान लँड होत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. विमान लँड करत असताना दृश्यमानता कमी असल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली आहे.