Lord Vishnu idol : खजुराहोतील भगवान विष्णू मूर्ती पुनर्स्थापनेसाठीची याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर संताप
खजुराहोतील जावरी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंच मूर्ती उभी आहे. ही मूर्ती शतकांपूर्वी मुघल आक्रमणांदरम्यान शिरच्छेदित झाली आणि आजही भग्न अवस्थेत आहे. या मूर्तीची पुनर्स्थापना करून मंदिराची पवित्रता अबाधित करण्यासाठी राकेश दलाल या श्रद्धावान भक्ताने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचा दावा होता की ही केवळ पुरातत्त्वाशी संबंधित बाब नाही, तर अखंड देवप्रतिमेची पूजा करण्याचा हा मूलभूत धार्मिक अधिकार आहे.