Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल- जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले; राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी
भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली.