Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांना ताकीद; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देऊ नका!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे.