London : लंडनमधील वीज केंद्राला आग, सर्वात मोठे विमानतळ बंद; 1300 उड्डाणे रद्द
ब्रिटनची राजधानी लंडनमधील हीथ्रो विमानतळ आज म्हणजेच शुक्रवारी बंद करण्यात आले. गुरुवारी रात्री विमानतळाजवळील एका विद्युत उपकेंद्रात आग लागल्याने विमानतळाचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. यामुळे १३०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे २ लाख ९१ हजार प्रवाशांवर परिणाम झाला आहे.