Lonavala Tourist : लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू; अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.