Anna Hazare : लोकायुक्तासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात; 30 जानेवारीपासून करणार उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी लोकायुक्तांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अण्णांनी तपोवनातील वृक्षतोडीलाही विरोध दर्शवला आहे.