PM Modi : पीएम मोदी म्हणाले- काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले, जिन्नासमोर नेहरू झुकले; एका तास भाषण, वाचा सविस्तर
पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या चर्चेची सुरुवात केली. त्यांनी एका तासाच्या भाषणात सांगितले की, ‘वंदे मातरम् ब्रिटिशांना सडेतोड उत्तर होते, ही घोषणा आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते आवडले होते. त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होते.