Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम
तृणमूल काँग्रेसमध्ये अलीकडे उफाळलेल्या असंतोष आणि काही खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षशिस्त मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाने वरिष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील मुख्य व्हिप (Chief Whip) म्हणून नियुक्ती केली आहे.