Local Body Elections : 31 जानेवारीपूर्वीच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकार, निवडणूक आयोगाला निर्देश
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) पालिका निवडणुका ३ वर्षांनी पुढे ढकलल्याबद्दल फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले.