ओव्यांपासून रंगभूमीपर्यंत, साहित्य, संस्कृती आणि विचारांचे वैभव; मुंबईत मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसानिमित्त’ अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मायमराठीला दिलेल्या अभिजात भाषेचा बहुमानाच्या गौरवशाली निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.