Mehul Choksi, : मेहुल चोक्सीचे जप्त केलेले 4 फ्लॅट लिक्विडेटरकडे सुपूर्द; PNB फसवणूक प्रकरणात ईडीची कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीशी संबंधित PNB कर्ज फसवणूक प्रकरणात जप्त केलेले मुंबईतील चार फ्लॅट अधिकृत लिक्विडेटरला सुपूर्द केले आहेत. ED ने आतापर्यंत भारतातील मुंबई, कोलकाता आणि सुरत या तीन शहरांमधील एकूण 310 कोटी रुपयांची मालमत्ता लिक्विडेटरला हस्तांतरित केली आहे.