India-China : लिपुलेख खिंडीतून भारत-चीन व्यापार रुपया-युआनमध्ये होईल; पूर्वी वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण
भारत आणि चीनने उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून व्यापार पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली होती. १८-१९ ऑगस्ट रोजी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. लिपुलेखसोबतच, शिपकी ला आणि नाथू ला खिंडीतूनही व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.