Election Commission : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘स्टार’ प्रचारकांची मर्यादा दुप्पट
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पक्षांच्या मागणीचा विचार करून प्रमुख किंवा स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ केली आहे. यापूर्वी प्रत्येक पक्षाला केवळ 20 प्रचारकांची नावे देण्याची परवानगी होती, मात्र आता ही मर्यादा वाढवून 40 प्रचारकांपर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना, प्रभावी वक्त्यांना आणि जनसंपर्कात कौशल्य असलेल्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी उतरवणे अधिक सोयीचे होणार आहे.