Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेचा पहिला जथ्था रवाना; जम्मूमध्ये LG मनोज सिन्हा यांनी यात्रेला दाखवला हिरवा झेंडा
अमरनाथ यात्रेसाठीचा पहिला जत्था बुधवारी जम्मूहून रवाना झाला. उपराज्यपाल (एलजी) मनोज सिन्हा यांनी भगवती नगर बेस कॅम्प येथून या जत्थाला हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान भाविक ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष करत राहिले. ही यात्रा ३ जुलैपासून अधिकृतपणे सुरू होईल.