Sudhir Mungantiwar, : मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा- सुधीर मुनगंटीवार संतापले, घरकूल निधीवरूनही रोष
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रौद्ररूप धारण केलेले पाहायला मिळाले. मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत स्वतःच्याच सरकारला धारेवर धरले. “सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा,” अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.