Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली. त्याचे तीव्र पडसाद शेवटच्या दिवशी सभागृहात उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला.