• Download App
    Legislative Council | The Focus India

    Legislative Council

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला- मुंबईची तिजोरी लुटणारे ‘रहमान डकैत’, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर

    आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’ आहेत, तर अशा डकैतांना पाणी पाजणारे आम्ही ‘धुरंधर’ आहोत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

    Read more

    Narhari Zirwal : मंत्र्यांची कबुली- 11 सरकारी रुग्णालयातून बोगस औषधींचे वितरण; दोषी कंपन्यांवर फौजदारी

    राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर होत असल्याची धक्कादायक माहिती विधान परिषदेत उघड झाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आमदारांच्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना, राज्यातील ११ शासकीय रुग्णालयांनी स्थानिक स्तरावर खरेदी केलेली औषधे बनावट आढळल्याची कबुली दिली.

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रात भीक मागण्यावर बंदी येणार विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर; मंजूरीवेळी गोंधळ

    राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे बहुचर्चित विधेयक मंगळवारी विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही मंजूर करण्यात आले. मात्र, हे विधेयक मंजूर होताना सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विधेयकातील त्रुटी, शीर्षकातील संदिग्धता आणि प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर खुद्द तालिका सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्याने पाठवलेले ‘शक्ती विधेयक’ केंद्र सरकारने नाकारल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

    Read more

    Ambadas Danve : निरोप समारंभावेळी अंबादास दानवे म्हणाले- मी पुन्हा येईन, चिंता करू नका! माझे काम सुरूच राहील!

    शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यानिमित्ताने आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. निरोपाच्या भाषणावेळी त्यांनी संघातील सुरुवात, शिवसेनेतील वाटचाल आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले नातेसंबंध सांगत आठवणींना उजाळा दिला. तसेच “मी पुन्हा येईन” आणि ” मी मार खाऊन घरी परतरणारा नाही” असे म्हणत लढण्याचा निर्धारही व्यक्त केला.

    Read more

    Thackeray : उद्धव ठाकरेंची जनसुरक्षा विधेयकात बदल करण्याची मागणी, म्हणाले- ते जनतेच्या सुरक्षेसाठी नाही

    उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे या विधेयकाचे नाव ‘जनसुरक्षा विधेयक’ऐवजी ‘भाजप सुरक्षा विधेयक’ ठेवा असा टोला, उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनसुरक्षा विधेयकात काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

    Read more

    विधानसभा निकालानंतर विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त; नाराजांची वर्णी लागण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा देखील पार केला आहे. भाजप, शिंदेंची शिवसेना […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्येही बनणार विधान परिषद, ममतांच्या मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

    West Bengal Cabinet : पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे विधान परिषद बनवण्याच्या निवडणुकीतल्या आश्वासनाला मंजुरी दिली आहे. ममता यांनी नुकत्याच […]

    Read more