Pune Jain : जैन बोर्डिंग जमीनप्रकरणी व्यवहार रद्द झाल्यास गोखले बिल्डरचे 230 कोटी बुडण्याची शक्यता, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. जागा विकत घेणारे गोखले बिल्डर्स यांनी ‘नैतिकतेच्या’ मुद्द्यावर या व्यवहारातून माघार घेत असल्याची घोषणा केली असली, तरी करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास, बोर्डिंगचे ट्रस्ट पैसे परत देण्यासाठी बांधील नाहीत. यामुळे बिल्डर विशाल गोखले यांनी दिलेले 230 कोटी रुपये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.