Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे क्रूरता नाही; यासाठी खटला दाखल करू शकत नाही
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निर्णयात म्हटले आहे की, जर पतीने घराच्या आर्थिक निर्णयांची स्वतःच जबाबदारी घेतली किंवा पत्नीला खर्चाचा हिशोब विचारला, तर याला क्रूरता म्हणता येणार नाही. विशेषतः, जोपर्यंत यामुळे पत्नीला कोणतेही गंभीर मानसिक किंवा शारीरिक नुकसान झाल्याचे सिद्ध होत नाही.