Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला छगन भुजबळ न्यायालयात आव्हान देणार; कागदपत्रांची पडताळणी सुरू
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासकीय निर्णय (जीआर) मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे आणि त्यामुळे ते या जीआरला न्यायालयात आव्हान देणार आहेत.