Rajan Salvi : राजन साळवी म्हणाले- वेदना, याचना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नाहीत, लोक सोडून का जातात याचे आत्मचिंतन करा!
उद्धव ठाकरे यांना लोक सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप साळवी यांनी केला आहे.