Rashmi Shukla : फडणवीस-शिंदेंना खाेट्या गुन्ह्यात गाेवण्याचा हाेता कट, रश्मी शुक्ला यांचा अहवाल बाॅम्ब
विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्याच्या गृह विभागाकडे सादर केलेल्या एका अहवालामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना २०१६ सालच्या एका गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, असा गंभीर ठपका या अहवालात ठेवला आहे.