Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या माजी गव्हर्नर लिसा कुक यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. ट्रम्प यांनी त्यांना फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर पदावरून काढून टाकले होते. लिसा कुक यांनी न्यायालयाला सांगितले की, ट्रम्प यांनी त्यांना काढून टाकण्याचा निर्णय चुकीचा आणि बेकायदेशीर आहे.