Anmol Bishnoi : अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्याची तयारी; लॉरेन्सचा भाऊ बाबा सिद्दिकी आणि मूसेवाला हत्याकांडात वाँटेड
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येत आहे. अनमोलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोलचे नाव समोर आले.