Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात FBI ची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन हार्ड बॉल’अंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापे
अमेरिकेची प्रमुख तपास यंत्रणा FBI (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) ने लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी समन्वित कारवाई हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ (Operation Hard Ball) या नावाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील 50 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान किमान 20 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.