• Download App
    Lavasa case | The Focus India

    Lavasa case

     Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा; CBI चौकशी आणि FIRची मागणी करणारी याचिका फेटाळली

    अनेक वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात गाजत असलेल्या बहुचर्चित ‘लवासा हिल स्टेशन’ गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि शरद पवार, सुप्रिया सुळे व दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

    Read more

    Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची शक्यता:चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल राखीव

    पुण्याच्या लवासा सिटी प्रकल्पाला दिलेल्या कथित अवैध परवानग्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्याच वेळी, ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखाड यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. दिवाणी अधिकार क्षेत्राचा वापर करताना न्यायालय पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकते, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांना दाखवता आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती या वेळी खंडपीठाने दिली.

    Read more

    Lavasa pawar Family : लवासा प्रकरणात पवार कुटुंबाविरुद्ध निलेश राणे सुप्रीम कोर्टात जाणार

    प्रतिनिधी मुंबई : लवासा हिल स्टेशन संदर्भात मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या “विशिष्ट हितसंबंधांवर” ताशेरे […]

    Read more