Air Force : हवाई दलाला हवेत 114 राफेल, संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला प्रस्ताव; 60% वस्तू स्वदेशी; 2 लाख कोटींचा करार शक्य
भारतीय हवाई दलाला ११४ ‘मेड इन इंडिया’ राफेल लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. यासाठी लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. ही विमाने फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतीय एरोस्पेस कंपन्या संयुक्तपणे तयार करतील. ‘मेड इन इंडिया’ राफेलमधील ६०% घटक स्वदेशी असतील.