Latur Municipal : लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक
लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:जवळील रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उशिरा त्यांच्या शासकीय बंगल्यावर घडली. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण कळू शकले नाही.