Lashkar-e-Taiba : लश्कर ए तोएबाचा प्रमुख हाफिज ISIच्या सुरक्षित स्थळी लपला; पाक लष्करप्रमुखाला भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची भीती
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद अबोटाबादच्या लष्करी छावणीतील गुप्तचर संस्था आयएसआयच्या छावणीत जाऊन लपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्करच्या मदरशात लपून बसलेल्या हाफिजला ‘हल्ल्याची’ भीती वाटत होती. त्यामुळे २७ एप्रिल रोजी मुरीदकेच्या मदरशात होणारा कार्यक्रमही रद्द केला आहे.