हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, 13 जणांचा मृत्यू; मृतकांमध्ये 6 महिन्यांच्या मुलीचाही समावेश, 2 प्रवासी जखमी
हिमाचल प्रदेशातील आदिवासी जिल्हा लाहौल-स्पीतीमध्ये आज (शुक्रवारी) दुपारच्या वेळी उदयपूर-किलाड रस्त्यावर कडू नाल्याजवळ धावत्या गाडीवर दरड कोसळली. यामुळे टाटा सूमो टॅक्सीमधील 13 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना सुखरूप वाचवण्यात आले.