Parth Pawar : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ; जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावे लागणार
पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केला होता. मात्र, या व्यवहारासाठी पूर्वी आयटी पार्क उभारण्याच्या कारणावरून जी मुद्रांक शुल्क सवलत मिळाली होती, ती आता लागू होणार नाही, असं निबंधक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.