Bawankule : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह; जागा निश्चितीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम
राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना निवास आणि अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून वसतिगृह उभारणीसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.