Bangladesh : बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; कपडे काढून अंगावर नाचले, 5 हल्लेखोरांना अटक
बांगलादेशची राजधानी ढाका येथे जमावाने केलेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. जिथे एका हिंदू भंगार व्यापाऱ्याला जमावाने मारहाण करून ठार मारले.९ जुलै रोजी हल्लेखोरांनी प्रथम व्यापारी लाल चंद सोहाग (३९) यांना विटा आणि दगडांनी मारहाण केली आणि नंतर मिटफोर्ड हॉस्पिटलजवळ त्यांचे डोके आणि शरीर क्रूरपणे ठेचले.