Lakshman Hake : मनोज जरांगेंचा मुंबईत दंगल घडवण्याचा डाव; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा दावा, त्यांना आंतरवाली सराटीत रोखण्याचे आवाहन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.