Achyut Potdar : ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन; वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हिंदी चित्रपटांत गाजवल्या भूमिका
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.