Ladaki Bahin scheme लाडकी बहीण लाभासाठी आता निकषांच्या चाळण्याच चाळण्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आता महिलांना निकषांच्या चाळण्याच चाळण्या पार कराव्या लागणार आहेत. यामुळे योजनेत होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी आता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे.