Labour Department : कामगार विभागाद्वारे निर्मित तीन लोकाभिमुख पोर्टल्सचे उदघाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MBOCW)च्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टीम (BMMS) आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजिलॉकर सुविधेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.